अमरावती- बाहेरून मुंबईत येऊन पैसे कमवायचे आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर करायची, हे कसे चालेल? असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे शिवसेनेतर्फे रेल्वे स्थानक परिसरात अभिनेत्री कंगना राणावत हिचा निषेध करण्यात आला.
कंगना राणावतच्या मुंबईवरील वक्तव्यावर शिवसेना आक्रामक, चांदूर रेल्वे येथे निषेध - chandur railway shivsena oppose kangana ranaut
कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टिकेची भडिमार सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.
कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टिकेचा भडिमार सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे येथे सेनेच्या वतीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात आंदोलन करून निषेध करण्यात आला.
हेही वाचा-अमरावतीत मुख्यमंत्रीविरुद्ध युवक काँग्रेस आणि प्रहार; मेळघाट रेल्वे ब्रॉडगेजवरून रंगले राजकारण