अमरावती :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अमरावती दौऱ्यावर आले. तपोवन चौक परिसरात शिवसैनिकांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवल्यामुळे खळबळ( Black Flags Shown Governor In Tapovan Chowk area ) उडाली.
Bhagat Singh Koshyari : वारंवार महाराष्ट्राचा केलेल्या अपमानाविरोधात शिवसैनिकांनी राज्यपालांना दाखवले काळे झेंडे - Black Flags Shown Governor In Tapovan Chowk area
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले चुकीचे विधान तसेच वारंवार महाराष्ट्राचा केलेला अवमान याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी त्यांचा अमरावतीत विरोध ( Bhagat Singh Koshyari on Amravati tour ) केला. शिवसैनिकांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवले.
शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात :तपोवन परिसरात असणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल गंगुबाई पटेल यांच्यात दोन्ही राज्याच्या सीमांवर असलेल्या जिल्ह्यातील प्रश्नां संदर्भात बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शासकीय विश्राम भवन येथून प्रबोधिनीकडे जात असताना तपोवन परिसरात शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनासमोर येत काळे झेंडे दाखवले ( Shiv Sainik Showed Black Flags To Governor ) तसेच त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या सात ते आठ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले चुकीचे विधान तसेच वारंवार महाराष्ट्राचा केलेला अवमान याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी त्यांचा अमरावतीत विरोध ( Bhagat Singh Koshyari on Amravati tour ) केला.
पोलिसांनी आधीच बजावली होती नोटीस :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज अमरावतीत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना दोन दिवसापूर्वीच नोटीस बजावली होती. राज्यपालांचा कोणीही पुतळा जाळू नये तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करू नये असा इशारा देखील पोलिसांनी या कार्यकर्त्यांना नोटीसद्वारे बजावला होता.