अमरावती :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभागाच्या वतीने मला दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी अमरावतीत निमंत्रित केले. अमरावतीला यायला निघाले तेव्हा अमरावतीच्या कलावंतांबाबत मी साशंक होते मात्र इथली वास्तविक परिस्थिती अतिशय वेगळी असल्याचे पाहून मला आनंद होत असल्याचे शर्वरी जमेनिस म्हणाल्या. अमरावती विद्यापीठात मी आले असताना अवघ्या पंधरा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या प्रादेशिक कला विभागाने तयार केलेला रंगमंच. रंगमंचाला लागून कलावंतांना तयारी करण्यासाठी अतिशय दर्जेदार असे ग्रीन रूम या ठिकाणी आहे.त नाटकासह संगीतासाठी लागणारे सर्व साहित्याची उपलब्धता या ठिकाणी आहे. इथे एकूणच वातावरण हे नृत्य आणि नाटक शिकण्यासाठी पोषक आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांना देखील इतकी उत्कृष्ट सुविधा सहज उपलब्ध होत नाही असेही शर्वरी जमेनिस बोलल्या. मुंबई आणि पुण्याच्या कलावंतांनी अमरावतीत आल्यावर एकदा तरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रादेशिक कला विभागाला भेट द्यावी असे आव्हान देखील शर्वरी जमेनिस यांनी केले आहे.
अमरावतीतून खूप चांगले कलावंत मिळतील :दोन दिवसांपासून मी अमरावतीत आहे आणि अमरावतीत आल्यावर विदर्भातील कथ्थक सह इतर कलाक्षेत्रात कला जोपासणाऱ्यांसाठी इथले वातावरण अतिशय पोषक आहे. अमरावतीतील कलावंतांना पाहून नृत्य साठी दिवस उज्वल आहेत. आणि अमरावतीतून आपल्याला खूप चांगले कलावंत मिळतील अशी आशा कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी व्यक्त केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कथ्थक नृत्य कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी त्या अमरावतीत आल्या आहेत.