महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यासाठी' शाम इंडो फॅब कंपनीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

अमरवती जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसीतील श्याम इंडो फॅब कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांप्रमाणे वेतन मिळत नसल्याचा जाब विचारण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते गेले होते. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी कंपनीतील साहित्याची तोडफोड केली.

तोडफोड झालेले साहित्य
तोडफोड झालेले साहित्य

By

Published : Nov 7, 2020, 6:31 PM IST

Updated : Nov 7, 2020, 8:06 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसीतील श्याम इंडो फॅब कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे पगार मिळत नसल्याचा आरोप करत आज (दि. 7 नोव्हेंबर) आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंपनीची तोडफोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बोलताना कार्यकर्ते
अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीत कापड निर्मिती करणारी श्याम इंडो फॅब कंपनी आहे. या कंपनीमध्ये जिल्ह्यातील शेकडो कामगार काम करतात. पण, कंपनीकडून या कामगारांचे कुठलेही कारण नसताना पैसे कपात करत असल्याच्या तक्रारी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या. आज या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली. पण, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने युवा स्वाभिमानच्या चार कार्यकर्त्यांनी कंपनीची तोडफोड केली.

कंपनीच्या कामगारांकडून आठ तासांतऐवजी बारा तास काम करून घेत आहेत. मात्र, त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शासन नियमाप्रमाणे आठ तासाचे 366 रुपये व बारा तासचे 550 रुपये देय असताना त्यांना 250 ते 300 सत्तर रुपये रोज दिला जात आहे, असेही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Last Updated : Nov 7, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details