महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Bus Stopped In Melghat : मेळघाटात एसटी बसच्या अनेक फेऱ्या बंद ; आदिवासी बांधवांसह शाळकरी विद्यार्थ्यांची पायपीट

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात गत तीन वर्षांपासून एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे (Several rounds of ST bus stopped in Melghat) या भागातील आदिवासी बांधवांना रोजगारांसह दैनंदिन व्यवहार करण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत (Facing difficulties tribals and school students) आहे.

ST Bus Stopped In Melghat
मेळघाटात एसटी बसच्या अनेक फेऱ्या बंद

By

Published : Nov 28, 2022, 11:44 AM IST

Updated : Nov 28, 2022, 2:23 PM IST

अमरावती :सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात गत तीन वर्षांपासून एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना रोजगारांसह दैनंदिन व्यवहार करण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो (Several rounds of ST bus stopped in Melghat) आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत (Facing difficulties tribals and school students) आहे.

मेळघाटात एसटी बसच्या अनेक फेऱ्या बंद प्रतिक्रिया देताना नागरिक

कोरोनाचा फटका, संपाचाही परिणाम :कोरोना काळात बंद झालेल्या बस फेऱ्यांपैकी मेळघाटात सुमारे 4 टक्के बस फेऱ्या पुन्हा सुरूच झाला नाही. कोरोनानंतर एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आदिवासी भागात एसटी बस फिरकली नाही. कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी, मेघाच्या दुर्गम भागात एसटी बसच्या फेऱ्या मात्र बंद झाल्यामुळे या भागातील रहिवाशांचा जणू छळच केला जातो आहे, अशी परिस्थिती आहे.



शंभर किलोमीटरपर्यंत आगार नाही :नागपूर आणि अमरावती येथून मध्य प्रदेशातील इंदोर बऱ्हाणपूर या शहरांना जोडणारा मार्ग मेळघाटातून जातो. नागपूर वरून इंदोरला जाणारी एकमेव बस फेरी ही नियमित आहे. धारणी हे तालुक्याचे ठिकाण असून देखील या ठिकाणी आगार नसल्यामुळे मधात एखादी गाडी बंद पडली, तर प्रवाशांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाची कुठलीही सुविधा या भागात नाही. धार्मिक शहरापासून महाराष्ट्रातील किंवा मध्य प्रदेशातील कुठलेही बस आगार हे 100 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर आहेत. या भागात मोबाईल फोनची रेंज नसल्यामुळे अडचणीत असलेले बस चालक किंवा प्रवाशांचा कुणाशीही संपर्क होऊ शकत नाही. अशा परिस्थितीचा विचार करून शासनाने धारणी येथे आगार सुरू करावा. आणि या ठिकाणी काही गाड्या नियमित राहतील. तसेच काही चालक-बालक देखील नियमित येथे उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करण्याची मागणी मेघाटातील आदिवासी बांधवांकडून केली जात (ST Bus Stopped In Melghat) आहे.


विद्यार्थ्यांची गैरसोय :कोरोनापूर्वी मेळघाटच्या अंतर्गत गावांमध्ये अनेक गाड्या धावत होत्या. यामध्ये प्रामुख्याने दादरा, तारूबांधा, भवर पटिया जाडीदा या गावांसह अनेक छोट्या छोट्या आदिवासी गावांपर्यंत एसटी बस रोज दिवसातून सकाळी आणि सायंकाळी अशी दोन वेळा तरी पोहोचायची. आता ह्या अंतर्गत गाड्याच बंद झाल्यामुळे मेघाटातील डोंगरकपारी वसलेल्या दुर्गम गावातील आदिवासी नागरिक आणि या भागातील विद्यार्थ्यांना धारणी, हरीसाल, चिखलदरा, गटांग आदी ठिकाणी असणाऱ्या शाळेत आणि महाविद्यालयात जाण्यासाठी बस फेऱ्याच उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना चक्क जंगलातून पायी चालत शाळा महाविद्यालय गाठावी लागत आहेत.



अकोट मार्गावर एसटी बसच नाही :मेळघाटात धारणी तालुक्यातील अगदी शेवटचे आणि डोंगरावर असणाऱ्या गोलाई या गावातून पूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरापर्यंत एसटी बस धावत होती. या बसमुळे लगतच्या धुळघाट, राणीगाव या भागातील रहिवाशांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारा किराणामाल तसेच इतर साहित्य अकोट येथून आणण्यास ही बस फेरी अतिशय सुविधेची होती. आज या मार्गावरून अनेक खाजगी बस धावत असताना राज्य राखीव परिवहन महामंडळाने मात्र आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी धावणारी बस गत चार वर्षांपासून बंद केली आहे. मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या गावातील लोकांसाठी अकोटला जाणारी गाडी त्वरित सुरू व्हावी, अशी मागणी देखील केली जात (Several rounds of ST bus) आहे.


लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही :मेळघाटातील एसटी बस फेऱ्या कमी झाल्या असतांना आदिवासी बांधवांना जो काही त्रास होतो आहे, त्याची दखल या भागातील आमदार व इतर लोकप्रतिनिधी घेत नाही, असा आरोप या भागातील रहिवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला. धारणी येथे आगार व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून कुठलीही हालचाल होत नाही. चिखलदरा येथे नवीन स्वरूपात बस स्थानक उभारण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कुठलीच बस येत नाही. या बस स्थानकावर 24 तास शुकशुकाट पाहायला मिळतो. मेघाच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर या तालुक्याच्या ठिकाणी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बस स्थानकाची नवी इमारत उभारण्यात आली. या ठिकाणी आजपर्यंत एकही बस आली नाही. आज या बस स्थानकाची अवस्था अतिशय खराब झाली असून अशीच परिस्थिती चिखलदऱ्याच्या बस स्थानकाची होऊ नये, अशी अपेक्षा मेळघाटातील आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. मेळघाटच्या आमदारांसह खासदारांनी देखील मेळघाटातील बस फेऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.


गाड्याच उपलब्ध नाही :मेळघाटातील एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोरोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक गाण्याची अवस्था ही अतिशय खराब झाली आहे. साध्या रस्त्यांवर देखील धावणाऱ्या गाड्या पेट घेत असताना मेळघाट सारख्या दुर्गम भागात उंच असा घाट चढण्यास जशा उत्कृष्ट दर्जाच्या गाड्या हव्यात. अशा गाड्याच परतवाडा आणि अमरावती आगारात उपलब्ध नाहीत, असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास गाड्या उपलब्ध होऊ शकतात, असे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट (tribals and school students in Melghat) केले.


4 हजार गाड्या होणार बंद :दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्या गाड्या दहा वर्षापर्यंत रस्त्यावर धावल्या अशा गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या महामंडळाकडे असणाऱ्या 13 हजार 500 बसपैकी एकूण 4 हजार गाड्या कमी होणार आहेत. यामुळे मेळघाटात बस फेऱ्या वाढतील, अशी शक्यता कमी असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागात देखील एसटी बस दिसणार नाही, अशीच शक्यता अधिक आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details