महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी - amravati seven day lockdown

लॉकडाऊन सोमवारी रात्री आठ वाजेपासून सुरु होणार आहे. या लॉकडाऊनमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंतच अमरावती शहर हे अनलॉक असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सकाळपासून दिसून येत आहे.

अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन
अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन

By

Published : Feb 22, 2021, 1:36 PM IST

Updated : Feb 22, 2021, 4:52 PM IST

अमरावती -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

विकेंड लॉकडाऊनची घोषणा

हा लॉकडाऊन सोमवारी रात्री आठ वाजेपासून सुरु होणार आहे. या लॉकडाऊनमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंतच अमरावती शहर हे अनलॉक असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सकाळपासून दिसून येत आहे. अमरावतीमधील महत्वाची बाजारपेठ असलेल्या शक्कर साथ परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

हेही वाचा -कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर

Last Updated : Feb 22, 2021, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details