अमरावती:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटाने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत नुटाच्या विरोधात असणाऱ्या शिक्षण मंचचा दारुण पराभव झाला आहे.
38 पैकी 31 जागांवर नुटाचा विजय:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्राचार्य मतदारसंघात एकूण 9 जागांपैकी 7 जागांवर नुटाचे सदस्य विजयी झाले आहेत. शिक्षक मतदार संघातील एकूण 10 जागा पैकी 8 जागा नुटाने जिंकले आहेत. विद्यापीठ शिक्षक या संवर्गात देखील तिन्ही जागांवर नुटाने विजय मिळवला आहे. तर पदवीधर मतदार संघात 10 पैकी सात जागा जिंकून नुटाने सिनेट निवडणुकीत एकूण 38 जागांपैकी 31 जागा मिळवून विजयाची परंपरा कायम राखली आहे.
शिक्षण मंचचा सफाया:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 2016 च्या सिलेक्ट निवडणुकीत नोटाच्या विरोधात भाजप प्रणित शिक्षण मंच उभे ठाकले होते. या निवडणुकीत नोटाला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत मात्र शिक्षण मंचचा पुरता सफाया झाला आहे. शिक्षण मंचचे प्रदेश अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांचा शिक्षक मतदार संघात सर्वसाधारण मतदार संवर्गात नुटाचे सुभाष गावंडे यांनी एकूण 800 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे शिक्षण मंचाचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप खेडकर यांनी विद्यापीठात एककल्ली कार्यक्रम राबविल्यामुळे त्यांच्या शिक्षण मंचमधील अनेक सदस्य त्यांच्यावर नाराज होते. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापकिनी सूर्यवंशी यांनी प्राध्यापक प्रदीप खेडकर यांचे भ्रष्टाचार सलग 4 वर्षांपासून सातत्याने उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता.
निवडणुकीत केवळ 7 जागांवर समाधान: शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत आघाडी असली, तरी शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील अनेकांना प्राध्यापक प्रदीप खेडकर यांचे एककल्ली वागणे मान्य नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या संघटनेतूनच फटाके लावण्यात आले. याचा परिणाम संपूर्ण संघटनेवर झाला असून शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आघाडीला या निवडणुकीत केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले.