अमरावती - सध्या जगभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात देखील कोरोना बाधितांचा आकडा १००० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वांना दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळेच मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी आता जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथील स्वामी समर्थ बचत गटातील महिलांनी घरगुती मास्क बनवले आहे. या मास्कला बाजारात चांगली मागणी आहे.
बचतगटाच्या माध्यमातून महिला तयार करतात मास्क, बाजारात मोठी मागणी
सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मास्कची नितांत गरज आहे. मंगरूळ दस्तगीर हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. सध्या कोरोनामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले मंगरूळ दस्तगीर गावात पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या बचत गटाचा व्यवसाय सुरू आहे. त्या महिला घरीच कापडापासून मास्क तयार करतात.
सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मास्कची नितांत गरज आहे. मंगरूळ दस्तगीर हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. सध्या कोरोनामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले मंगरूळ दस्तगीर गावात पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या बचत गटाचा व्यवसाय सुरू आहे. त्या महिला घरीच कापडापासून मास्क तयार करतात. मास्कला सॅनिटाईझ करून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवले जाजात. सुरुवातीला त्यांच्याकडे १०० मास्कची मागणी आली. त्यानंतर ५०० मास्कची मागणी आली. ना नफा-ना तोटा अशा उद्देशाने एक मास्क १५ रुपये किंमतीत विकला जातो. यासाठी पंचायत समिती स्थरावरून नियुक्त अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतात. त्यानुसार त्याची विक्री केली जाते. या बचत गटाप्रमाणे घरबसल्या छोटासा उद्योग केल्यास बंदीच्या काळात आर्थिक चणचण जाणवणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे या महिलांनी इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.