अमरावती - लॉकडाऊनच्याच्या काळात अमरावती जिल्ह्यातील सर्व दारू दुकानाला सील लावण्यात आले आहे. अशातच सील लावूनही मागच्या दाराने दारूची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार कारंजा बहिरम येथे घडला. उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी अहवालात बार मालकांचे बिंग फुटले असून आता सदर बार मालकाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.
सील बिअर बारमधून मागच्या दाराने विक्री
कारंजा बहिरम येथील हरी श्रद्धा बार रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून बार बंद असून कालपासून फक्त बाईन, बिअर शॉप व देशी दारूला परवानगी देण्यात आली आहे. तर बार मात्र बंदच आहे. मात्र सील लावलेल्या बारमधून मागील बाजूनी असलेल्या दारातून दारूची विक्री या बारमधून चालू होती.
कारंजा बहिरम येथील हरी श्रद्धा बार रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून बार बंद असून कालपासून फक्त बाईन, बिअर शॉप व देशी दारूला परवानगी देण्यात आली आहे. तर बार मात्र बंदच आहे. मात्र सील लावलेल्या बारमधून मागील बाजूनी असलेल्या दारातून दारूची विक्री या बारमधून चालू होती. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग सर्व बारमध्ये जाऊन पाहणी करत आहे. या दरम्यान मागील दारातून दारूची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता बार मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून आता या बार मालकाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.