अमरावती -जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी न करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून दर्यापूर येथील पोस्ट कार्यालयासमोरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे लग्नसोहळा सुरू होता. यामुळे प्रशासनाच्या वतीने हे मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंगल कार्यालय मालक व कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शासकीय नियम डावलून मंगल कार्यालयात लग्न सोहळा सुरू ठेवण्यात आलेली जिल्ह्यातील प्रथम कार्यवाही आहे. यादरम्यान तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी गीता वंजारी व त्यांचे सहकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणची पाहणी केली असता आयोजकांना लग्नसोहळा पार पाडण्यासाठी 20 लोकांची परवानगी मिळाली होती.