अमरावती -जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 110 गावे हे पूर्णता सील करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयांमध्ये केवळ मेडिकल सुरू ठेवण्याची मुभा देण्यात देण्यात आली आहे.
अमरावतीतील 110 गावे सील; केवळ मेडिकल राहणार सुरू
अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 110 गावे हे पूर्णता सील करण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णयांमध्ये केवळ मेडिकल सुरू ठेवण्याची मुभा देण्यात देण्यात आली आहे.
अमरावतीतील 110 गावे सील; केवळ मेडिकल राहणार सुरू
अनेक गावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गर्दी करत आहेत. जीवनाश्यक वस्तूमध्ये मोडणारा भाजीपाला, दूध, किरणाची दुकाने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. ज्या लोकांना किराणा भाजीपाला खरेदी करायचा आहे. त्या लोकांना घरपोच सेवा देण्याचा आदेशही प्रशासनाने दिला आहे.
तिवसा आणि धारणी शहरही कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु अनेक गावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुकानांमध्ये नागरिक गर्दी करण्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.