अमरावती -कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या इयत्ता आठवीपासून दहावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरासह ग्रामीण भागातील शाळाही सज्ज झाल्या आहेत.
बंद काळात अनेक शाळांची दुरुस्ती -
शाळा बंद असताना अमरावती शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अनेक शाळांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. अमरावती शहरातील जिल्हापरिषदेच्या सायन्सकोर या शाळेच्या काही भागात दुरुस्तीचे काम शाळा बंद असतानाच्या काळात पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शाळेला नवा रंगही देण्यात आला आहे. यासह शहरातील कॅम्प परिसरात असणाऱ्या श्रीराम विद्यालयाने शाळा बंद असतानाच्या काळात अत्याधुनिक प्रयोगशाळा शाळेत निर्माण केली आहे. खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श शाळेनेदेखील अत्याधुनिक प्रयोगशाळेसह अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. अमरावती शहरातील मनीबाई गुजराती हायस्कूल, श्री समर्थ महाविद्यालय, श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय, श्री गणेश दास राठी विद्यालय, ज्ञानमाता हायस्कूल या नामांकित शाळांच्या परिसरात स्वच्छता पाहायला मिळाली.
ग्रामीण भागातील शाळेची मैदानही सुधारली -