अमरावती- अडीच महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवा गणवेश, नवी पुस्तक आणि बऱ्याच दिवसानंतर भेटलेल्या मित्रांमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.
अमरावतीत शाळेला सुरुवात; नवा वर्ग अन् नव्या मित्रांमध्ये चिमुकले दंग - शाळा
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गट शैक्षणीक वर्षात गुणवत्ता यादीत झळकलेले, स्कॉलरशीप आदी परीक्षेत प्रथम येणारे तसेच विविध क्रीडा स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार करण्यात आला.

यंदा इयत्ता पहिलीत जाणाऱ्या आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आई-वडीलही मोठ्या उत्साहाने शाळेत येताना दिसले. आपले वर्गशिक्षक कोण आहेत? आपला वर्ग कोणता आहे? यंदा वर्गात नव्याने आलेले विद्यार्थी कोण, कसे आहेत? हे जाणून घेण्यात चिमुकले दंग झाले होते. दोन अडीच महिन्यापासून शांत असणाऱ्या सर्व शाळांच्या आवारात आज सकाळपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाटासह नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला.