अमरावती - तालुक्यातील कठोरा या गावात एडिफाय ही नामांकित शाळा धोकादायक ठिकाणी बांधण्यात आली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली ही शाळा एका फटाक्याच्या गोदामाला लागूनच बांधण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने फटाक्यांच्या गोदामात अपघात झाल्यास चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला जबाबदार ठरेल असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शाळा नेमकी कुठे असावी याचे ठराविक नियम आहेत. असे असताना देखील अमरावतीत फटाक्यांच्या गोदमाला लागून शाळा सुरू करण्याची परवानगी कशी देण्यात आली, या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कसे नाही, अमरावतीचे कोणी लोकप्रतिनिधी या गंभीर विषयाची दाखल का घेत नाहीत, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.