महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 3, 2023, 1:30 PM IST

ETV Bharat / state

Weightlifter to literary : राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकाविणाऱ्या पल्लवीचा वेटलिफ्टर ते साहित्यिक क्षेत्राकडे प्रवास

( Savitribai Phule Jayanti Special News ) वेटलिफ्टर खरंतर हा पहिलवानीचाच ( Weightlifter to literary ) क्रीडा प्रकार आहे. यामध्ये राज्य पातळीवर चमकल्यावर थेट राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक ( National level gold medalist Pallavi ) मिळविणारी अमरावतीची पल्लवी पवार आज नृत्य, साहित्य आणि संभाषण क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. वेटलिफ्टर ते थेट साहित्यिक असा दोन टोकांचा प्रवास गाठतानाचे अनुभव पल्लविने ( Pallavi has double edged journey ) शेअर केले.

Weightlifter to literary
वेटलिफ्टर ते साहित्यिक

वेटलिफ्टर ते साहित्यिक

अमरावती :राजापेठ परिसरात भाड्याच्या घरात राहात असताना घर मालकाच्या मोठ्या मुलाने मला सर्वात आधी आमच्या परिसरात असणाऱ्या जवाहर क्रीडा मंडळात नेले. (Weightlifter to literary ) त्या ठिकाणी वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण मला घ्यायला लावले. त्यावेळी मी अवघी इयत्ता सहावीला शिकत होती. ( National level gold medalist Pallavi ) जवाहर क्रीडा मंडळ येथून माझा वेटलिफ्टिंग क्षेत्रात प्रवास सुरू झाला असे पल्लवी पवार सांगते. ( Pallavi has double edged journey ) याच जव्हार क्रीडा मंडळात वेटलिफ्टिंगचा मला पहिला बार महेश एलगुंदेले यांनी पकडायला शिकवला. यानंतर मी या क्रीडा मंडळातून अनेक स्पर्धेत सहभागी झाली. त्यावेळी माझ्या आईने मला निशा गायकवाड यांच्या मदतीने थेट बेंगलोरला प्रशिक्षणासाठी पाठवले.

मधुरा सिंहासने यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण :अडीच वर्षापर्यंत मी बंगलोरला वेटलिफ्टिंगचे खास प्रशिक्षण घेतले. त्यानंतर काही दिवस अमरावतीला सराव केल्यावर ठाण्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा सिंहासने यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घ्यायला गेले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक पटकावू शकले. माझ्या स्वप्नातला महाराष्ट्राचा ट्रॅक सूट मला मधुरा सिंहासने यांच्यामुळे मिळाला. मधुरा सिंहासने यांच्याकडून मी वेटलिफ्टिंगचे खरे प्रशिक्षण घेत असतानाच एक चांगला माणूस कसा घडावा हे सुद्धा शिकले. चांगली माणस समाजासाठी किती महत्त्वाची आहे. हा धडा सुद्धा आम्हाला मधुरा सिंहासने यांच्याकडून शिकायला मिळाला. माझे प्रशिक्षक दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन सुद्धा अतिशय मोलाचे ठरले. या थोर प्रशिक्षकांच्या संस्कारामुळेच मी या क्षेत्रात उत्कृष्ट असे घडू शकले. खरंतर या क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी अनेकदा मार देखील खावा लागला. मधुरा सिंहासने यांचे वडील सांगली येथील प्रख्यात वेटलिफ्टर नाना सिंहासने यांचे मार्गदर्शन देखील मला लाभले. माझ्या या थोर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातच मी खेलो इंडिया सहभागी झाले चार वेळा राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवू शकले असे पल्लवी म्हणाली.



कोरोनामुळे हुकली शासकीय नोकरीतील संधी :वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकाविले असताना पल्लवी पवारला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी दिल्ली पोलीसमध्ये नोकरीची संधी चालून आली होती. कर्तव्यावर हजर होण्यासंदर्भातील पत्र तिच्या घरी आले होते. मात्र त्यावेळी कोरोना असल्याने घरच्यांना अशा परिस्थिती लाडक्या मुलीला पाठवण्याची हिंमत सेंट्रींग कामावर मजुरीचे काम करणारे पल्लवीचे वडील विनोद पवार आणि छोटेसे बुटीक चालविणारी आई योगिता पवार यांची झाली नाही. आज याबाबत तिच्या कुटुंबीयांना काहीशी खंत वाटत असली तरी पल्लवी मात्र आपल्या आई-वडिलांचा निर्णय कधीही चुकीचा ठरला नाही असे सांगते. ही एक संधी गेली तरी आयुष्यात बरेच काही आहे थोड्याफार गोष्टींसाठी पश्चाताप करण्यात अर्थ नाही असे मोठ्या आत्मविश्वासाने पल्लवी सांगते.


मराठी भाषेवरील प्रेमामुळे साहित्यात रस :पल्लवी छान कविता लिहिते. विविध विषयांवर लेखनही करते. यासोबतच उत्कृष्ट अशा संभाषण कला तिच्या अंगी आहे. कार्यक्रमांचे बहरदार सूत्रसंचालन देखील ती करते. वेटलिफ्टर असताना देखील केवळ मराठी भाषेवर असणाऱ्या प्रेमामुळे मी मराठी साहित्यात कडे वळले. शब्दांची तोडमोड करायला मला जेव्हा जमले तेव्हा मी कविता करायला लागली असे पल्लवी सांगते. पल्लवी आपल्या घरी चिमुकल्यांची शिकवणी घेते तसेच त्यांना नृत्याचे धडे देखील देते.


साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र गौरव हेच ध्येय :क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकाविले असताना आता साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र गौरव आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी मी चांगल्या साहित्य निर्मितीवर भर देते आहे. 2022 चा साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार पवन नालट यांना मिळाला. मी देखील त्यांच्याप्रमाणेच माझ्या कवितेला साहित्याला योग्य न्याय देऊन या क्षेत्रात देखील उंच भरारी घेईल अशी आशा पल्लवी व्यक्त करते.

ABOUT THE AUTHOR

...view details