अमरावती - सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तात्काळ भारतरत्न सन्मान द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सत्यपाल महाराज यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदेव भक्त आक्रमक झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत युवक मंच व गुरुदेव भक्तांच्या वतीने तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी समोर घोषणा देत भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.
तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या, अन्यथा आंदोलन करु; सत्यपाल महाराजांचा सरकारला इशारा - AMRAVATI BHARATRATNA TO TUKDOJI MAHARAJ NEWS
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव भक्त आक्रमक झाले आहे. तुकडोजी महाराजांना तात्काळ भारतरत्न सन्मान द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सत्यपाल महाराज यांनी सरकारला दिला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार
१६ वर्षांपासून सुरू आहे लढा
तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान द्यावा, यासाठी 2003पासून गुरुदेव भक्तांनी लढा उभारला आहे. परंतु अद्यापही राज्य सरकार व केंद्र सरकारने कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप गुरुदेव भक्तांनी केला आहे. लाखो गुरुदेव भक्त हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी करणार आहे. तात्काळ भारतरत्न सन्मान न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गुरुदेव भक्तांनी दिला आहे.