महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#CAA Protest : अमरावतीमध्ये 13 जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू - यशोमती ठाकूर सत्याग्रह आंदोलन लेटेस्ट बातमी

हा कायदा आणून देशाच्या संविधानाला छेडछाड करु पाहत असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Satyagraha protest against CAA NRC in amravati
#CAA Protest : अमरावतीमध्ये 13 जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरु

By

Published : Jan 19, 2020, 9:06 PM IST

अमरावती - केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए, सीएबी कायद्याच्या विरोधात शहरात गेल्या १३जानेवारी पासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. आज (रविवारी) राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

हा कायदा आणून देशाच्या संविधानाला छेडछाड करु पाहत असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. शहरातील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे. १३ जानेवारीपासून भारतीय संविधान सुरक्षा संघर्ष समितीच्यावतीने एनआरसीच्या विरोधात हे सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये आंदोलनाच्या दररोज वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात आहेत.

हेही वाचा -'सीएए अन् एनआरसी हे भारताचे अंतर्गत विषय'

ABOUT THE AUTHOR

...view details