अमरावती - राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतील तुकडोजी महाराजांचे प्रार्थना मंदिर व समाधी, ही आज सकाळी सामुदायिक ध्यानानंतर कोरोना काळातील सर्व नियम पाळून खुली करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे समाधीचे दर्शन सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच भाविकांचे औक्षण करून त्यांना तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पहिल्या पाच भाविकांना ग्रामगीता भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल आठ महिन्यापासून राज्यभरातील सर्व छोटी मोठी धार्मिक स्थळे हे बंद होती. त्यामुळेच राज्यातील महत्वाचे धार्मिक स्थळ असलेली तुकडोजी महाराज यांची गुरुकुंज मोझरीतील महासमाधीही बंद होती. आता राज्य सरकारच्या परवानगीनंतर ही समाधीही आज सकाळी सामुदायीक ध्यानानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी पहिल्या पाच भविकांना ग्राम गीता भेट देण्यात आली. तत्पूर्वी काल संस्थानच्या वतीने संपूर्ण समाधी परिसर सॅनिटाइज करण्यात आला होता. आजपासून दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
आता होणार समाधीचे जवळून दर्शन