अमरावती -लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जे काही झालं ते सगळं आता विसरायचे आहे. अमरावती जिल्ह्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष अशी आपुलकी आहे. अमरावतीत पूर्वी असणारे पक्षाचे वैभव आता ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश खेचून परत मिळवावे असे आवाहन राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले. 18 जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात मोठा विजय मिळावा यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संजय राठोड यांनी येथील अभियंता भवन येथे वैयक्तिक संवादही साधला.
अमरावतीत हरवलेले शिवसेनेचे वैभव ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा मिळवा - संजय राठोड
नवीन वर्षात गटबाजी विसरा अमरावती जिल्ह्यात पक्षाला सतत पराभव पहावा लागत आहे. पक्षाचे वैभव आता ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश खेचून परत मिळवावे असे आवाहन राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले.
नवीन वर्षात गटबाजी विसरा अमरावती जिल्ह्यात पक्षाला सतत पराभव पहावा लागत आहे. लोकसभेत पराभव विधानसभेत पराभव, विधानपरिषदेत पराभव हे चित्र योग्य नाही. आशा बैठकांना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास दिसतो प्रत्यक्षात मात्र निकाल वेगळा येतो. या मागे जिल्ह्यात पक्षात असणारी गटबाजी हे महत्वाच कारण आहे. आता 31 डिसेंबरला गटबाजी सोडून 2021मध्ये शिवसेनेचे वेगळे चित्र निर्माण करा असे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीप जाधव यावेळी म्हणले. भाजपशी हातमिळवणी नको ग्रामपंचायतींवर आम्हाला भगवा फडकवायचा आहे. मात्र, हा भगवा फडकविण्यासाठी कुणीही भाजप सोबत जाणार नाही. आम्हला कोणत्याही पक्षा सोबत युती चालेल मात्र भाजपसोबत नको. आपल्यापैकी कुणी भाजपशी हातमिळवणी केली तर पक्षाकडून त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिलीप जाधव यांनी दिला.