अमरावती -व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करून त्यावर शेवटचे सोपस्कर पार पाडले जातात. अनेकांची तेरवी व दशक्रिया केली जाते. मृत्यू पावलेली व्यक्ती कदाचित संत महात्मा असेल तर भारतीय संस्कृतीनुसार वैश्विक कार्य, चमत्कार किंवा सिद्धी प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीचे एखादी समाधी किंवा मंदिर हे उभारले जाते. पण, कधी सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचे मंदिर किंवा समाधी उभारली, असे सहसा होत नाही. परंतु, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा या गावातील एका कुटुंबातील लोकांची मात्र मृत्यू नंतर मंदिरे उभारल्या जाते.
हेही वाचा -अमरावतीत आठ लाखांच्या गुटख्यासह तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
सावंगा विठोबा गावात आजपर्यंत तबल पन्नासच्या जवळपास व्यक्तींची मंदिरे उभारली गेली आहेत. पण, मृत्यूनंतर मंदिरे उभारली जातात, असे हे एकमेव गाव असल्याचा दावाही केल्या जातो. हे मंदिर उभारण्यामागेही एक इतिहास आहे.
सावंगा विठोबा हे संत कृष्णाजी महाराज यांचे देवस्थान आहे. या देवस्थानात दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. गुढीपाडव्याच्या सणाला येथे मोठा उत्सव असतो. राज्यातील लाखो भाविक येथे हजेरी लावतात. लाखो रुपयांचा कापूर त्या दिवशी येथे जाळला जातो. साधारनत: शेकडो वर्षांपूर्वी संत कृष्णाजी चतुर महाराज हे सावंगा विठोबा येथे आल्याचे येथील चतुर कुटुंबातील लोक सांगतात. कृष्णाजी महाराज यांच्या पश्चात त्यांना पाच मुले होती. त्यातील दोन मुलांच्या समाधी जवळच असलेल्या चिरोडी या गावात आहेत. तर, तीन मुलांच्या समाधी सावंगा विठोबा येथील स्मशानभूमीमध्ये आहेत.
संत कृष्णाजी महाराज यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी, माझे काम चतुर कुटुंब पाहिल, असे सांगितले होते. संत कृष्णाजी महाराज यांच्या निधनानंतर पूजा-अर्चना करिता येणारे भाविक हे चतुर कुटुंबाकडे आपली व्यथा, दुःख, आजार घेऊन जातात. त्यावेळेस त्यांना चतुर कुटुंबातील सदस्य हे मार्गदर्शन करतात. ज्या लोकांचे आजार बरे होतात, ते लोक मग आमच्या कुटुंबातील लोकांना देव मानतात. आमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावे मंदिर बांधून तेथे पूजा करत असल्याची माहिती चतुर कुटुंबातील सदस्यांनी दिली.
कृष्णाजी महाराज यांचे वंशज असल्याने चतुरकुटुंबाला विशेष मान