अमरावती -कोरोना विषाणूचा संसर्ग अमरावती जिल्ह्यात वाढत असल्याने दवाखाने व मेडिकल वगळता बाजार समित्यासह, सर्व जीवनावश्यक वस्तूचे आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत होता. कारण खरिप हंगाम काही दिवसांवर असताना मात्र बाजार समित्या बंद होत्या, त्यामुळे शेतमाल कुठे विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. दरम्यान शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत आता अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या नियम आखून सुरू करण्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी दिल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मान्सून पूर्व दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची नियमावली पाळणे गरजेचे