महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान.. - welfare

अमरावतीतील या पाणपोईस ३० वर्षे झाली आहेत. विदर्भातील सर्वात मोठी पाणपोई कुठली असेल तर अमरावतीची असे म्हणणं वावग ठरणार नाही.

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान..

By

Published : Apr 24, 2019, 2:29 PM IST

अमरावती - रणरणत्या उन्हात तहान लागल्यास पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. त्यात प्रवास करताना रांजणातील थंड पाणी प्यायला मिळाल्यास मन तृप्त होते. अशाच तहानलेल्या प्रवाशांची तहाण भागवण्याचे काम अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील पाणपोई करत आहे.

सातत्याने ३० वर्षांपासून १११ रांजन असलेली पाणपोई सुमारे २५ हजार प्रवाशांना मोफत थंड व शुद्ध पाणी पाजते. श्री संत सितारामदास बाबा चॅरिटेबल ट्रस्टकडून ही भव्य पाणपोई चालवली जाते.

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान..

अमरावती येथील सुनेलालजी मंत्री यांनी १९८९ मध्ये या पाणपोईची स्थापना केली होती. पालदास राठी सांगतात, मी सहा वर्षांपासून येथे कार्यरत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नामवंत व्यक्तीकडून पाणपोईचे उद्घाटन केले जाते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह मोठ्या उच्च पदावर विराजमान असलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी येथे उद्घाटनाला आले आहेत.

एकूण १११ रांजण असलेल्या या पाणपोईमध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी तीन महिने १२५ स्वयंसेवक काम करत असतात. येथे दरवर्षी नवीन रांजण विकत आणले जातात. पाणपोई बंद झाली की गरजूंना रांजण मोफत दिले जाते. एसटीबसमधील चालक वाहकांना विशेष सोय म्हणून पाच लिटरच्या कॅनमध्ये त्यांना पाणी दिले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details