अमरावती -दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही दिवाळीच्या खरेदीसाठी अमरावती शहरात तुफान गर्दी उसळली आहे. खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन नाही तसेच विनामास्क लोक घराबाहेर पडलेले दिसून आले. अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत असताना अशाप्रकारे उसळलेली गर्दी धोक्याचे संकेत आहेत की काय असा प्रश्न पडत आहे.
#Diwali2020 अमरावतीत दिवाळीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा - amravati diwali shopping news
दिवाळीच्या खरेदीसाठी अमरावती शहरात तुफान गर्दी उसळली आहे. खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

अमरावती दिवाळी खरेदीसाठी गर्दी
अमरावती दिवाळी खरेदीसाठी गर्दी
इतर जिल्ह्यातील ग्राहक
अमरावतीमधील राजकमल चौक, चित्रा चौक यासह विविध ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा पार फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. विदर्भात अमरावती ही कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील ग्राहक हे दिवाळीच्या खरेदीसाठी अमरावतीमध्ये येत असतात.