अमरावती -ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत डोंबिवली येथे आलेला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होताच राज्य सरकारच्यावतीने खबरदारीचे आदेश दिले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील कोरोना चाचणी केंद्रातही याबाबत सतर्कता पाळली जात आहे. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे अमरावती शहरातील विविध भागात कोरोना लसीकरण केंद्रांवर ( rush at vaccination centers in Amravati ) गर्दी वाढली आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी केंद्राकडून दिल्ली येथील आरोग्य विभागाचे राष्ट्रीय देखरेख केंद्राने सिटी स्कोअर 30 पर्यंत असणारे स्वॅब मागविले आहेत. ही माहिती विद्यापीठातील चाचणी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. अमरावतीत ओमिक्रॉनची लक्षणे असलेला कोणताही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे भीती नाही. मात्र, सतर्कता बाळगणे, मास्कचा वापर करणे, ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे ( Prashant Thakare on corona protocols ) यांनी स्पष्ट केले.
लसीकरण केंद्रांवर वाढली गर्दी
ओमिक्रॉनची धास्ती आणि लस घेतल्याशिवाय सरकारच्या अनेक योजनेपासून वंचित राहावे लागेल या भीतीमुळे अमरावती शहरात लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी वाढली आहे. अमरावती महापालिका प्रशासनाच्यावतीने लसीकरणावर भर दिला जात आहे. नागरिकांनी त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यावतीने ( Amravati commissioner Prashant Rode on vaccination ) करण्यात आले आहे.
हेही वाचा-vaccination certificates compulsory for Best : बेस्ट प्रवासाकरिता दोन लशींचे प्रमाणपत्र बंधनकारक