अमरावती - राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने आज(रविवार) रन फॉर ब्रेव्ह या संकल्पनेने पोहरा जंगलात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ३ किलोमीटर १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा ३ गटात आयोजित या स्पर्धेत एकूण ३५०० स्पर्धक सहभागी झाले होते.
'रन फॉर ब्रेव्ह' मॅराथॉन स्पर्धा रविवारी सकाळी ५.३० वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावतीचे समादेशक लोहित माथानी यांनी हिरवी झेंडा दाखवून २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस समारंभासाठी मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक ध्यानचंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
हेही वाचा - अमरावती शहरासह जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस
पोहरा जंगल हे वन्यप्राण्यांनी समृद्ध असून आज त्या जंगलातून जाणाऱ्या अमरावती चांदुर रेल्वे मार्गावर एकूण ३५०० स्पर्धक धावले. ३ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत एकूण २६०० स्पर्धेत सहभागी झाले. तर, १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत ७०० स्पर्धक आणि २०० स्पर्धक २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमुळे रविवारी राज्य राखीव पोलीस दल परिसरासह उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वृद्ध असो व चिमुकले सगळ्याच वयोगटातील धावपटूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती कायदा : अमरावतीमधील १६० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची अपेक्षा