अमरावती -संपूर्ण देशात संचारबंदी असताना ग्रामीण भागामध्ये शासनाच्या संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. गुरुवारी अंजनगावसुर्जी येथील भंडारज येथे बाजार भरला होता. नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.त्यामुळे गावसमिती दल आपले काम गांभीर्याने करत नसल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागात संचारबंदी नियम धाब्यावर; अंजनगावसुर्जीतील बाजारामध्ये लोकांची गर्दी
कोरोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण असताना, राज्यातील ग्रामीण भागात सर्रास नागरिका इतरत्र फिरताना दिसत आहेत. लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात एक ग्राम समिती दल स्थापन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण असताना, राज्यातील ग्रामीण भागात सर्रास नागरिका इतरत्र फिरताना दिसत आहेत. बिनधास्तपणे चौकात गर्दी करून बसणे, फिरणे चालू आहे. लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात एक ग्राम समिती दल स्थापन करण्यात आले आहे. राज्या शासनाने २२ मार्चला कलम १४४ लागू केले आहे. ज्यामुळे चार पेक्षा जास्त लोकांनी एका ठिकाणी जामण्यावर बंदी आहे.
भंडारज येथील भरलेला भाजी बाजार येथे झालेल्या गर्दीनंतर ग्राम समिती दलाच्या पदाधिकाऱ्याने बाजार बंद केला आणि लोकांना घरी जायला सांगितले.