अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठांतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्यातील बग्गी या गावातील प्रशांत मोहोड या शेतकऱ्यांने त्याच्या शेतातील कोहळ्याच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवून पीक उद्धवस्त करुन टाकले.
फटका टाळेबंदीचा : भाव नसल्याने दोन एकर कोहळ्याच्या पिकावर फिरवले रोटावेटर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे बाजारपेठाही ठप्प आहेत. शेतमाल विक्रीला परवानगी असली तरी कोहळ्याकडे कोणीही पाहत नाही. यामुळे कोहळ्याला मागणीच नसल्या कोहळा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
कोहळ्याच्या पिकावर रोटावेटर फिरवताना शेतकरी
प्रशांत मोहोड यांनी यावर्षी आपल्या शेतात दोन एकरांवर कोहळ्याची लागवड केली होती. यावर्षी भाव चांगला मिळेल या आशेने त्यांनी या पिकाला मशागत केली त्यामुळे उत्पादनसुद्धा चांगले झाले. पण, बाजारपेठ व बाजार भाव नसल्याने या शेतकऱ्याने हताश होऊन शेवटी दोन एकर कोहळ्याच्या शेतात रोटावेटर फिरवून उभे पीक नष्ट केले.
हेही वाचा -दारू दुकानदाराकडून 'दर्दी ग्राहका'चे हार घालून जंगी स्वागत, तळीरामांकडूनही हार घालत आभार