महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या'च्या मृत्यूनंतर कुटूंबानी जपली सामाजिक बांधिलकी, भटक्या मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

तो नेहमी शहरातील भटक्या मुलांना भेट वस्तू दयायचा आणि त्यांना हवे असेल ती मदत करायचा. त्यांचे सामाजिक दाईत्व तो गेल्यावर ही सुरु राहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा ध्यास धरला आहे.

By

Published : Mar 25, 2019, 2:04 PM IST

रोशन शिंदेंचे कुटुंबिय आणि मित्र

अमरावती - विविध उपक्रमातून गरीब मुलांना मदत करणारा रोशन शिंदेचा मागील वर्षी अपघातात मृत्यू झाला. सोमवारी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे सामाजिक दायित्व त्याच्या कुटुंबीयांनी पुढे नेत शहरातील भटक्या मुलांना मदत करत साजरा केला. या लहान मुलांसोबत रोशनच्या नावाचा केक कापून शिंदे कुटुंबियांनी आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.

रोशन शिंदेंचे कुटुंबिय आणि मित्र


सामाजिक कार्याची जाणीव ठेवून गरिबांना मदत करणाऱ्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने चांदुर रेल्वे येथील रहिवासी हताश झाले होते. मात्र, तो आपल्यात नसला तरी त्याचे सामाजिक दायित्व त्याच्या आई-वडिलांनी पूर्ण केले. रोशन आधीपासूनच प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तत्पर असायचा. तो नेहमी शहरातील भटक्या मुलांना भेट वस्तू दयायचा आणि त्यांना हवे असेल ती मदत करायचा.


त्याच्या कुटुंबीयांनी अमरावती येथील भटक्या मुलांना मदत करून त्यांच्यासोबत आज रोशनचा वाढदिवस साजरा केला. शहरातील काही महाविद्यालयीन तरुण शनिवार आणि रविवारी या भटक्या मुलांची शाळा चालवितात. त्याच शाळेला रोशनच्या कुटुंबियांनी एका महिनाचे धान्य दिले आहे. तसेच, त्यांना विविध खेळण्याचे साहित्य देण्यात आले. रोशनचे सामाजिक दाईत्व तो गेल्यावर ही सुरु राहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा ध्यास धरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details