महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फायदा घेत फोडले किराणा दुकान, रोख रकमेसह किराणा लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद - robbery in grocery shop

लॉकडाऊनचा फायदा घेत अमरावती शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या वलगावातील एक किराणा दुकान अज्ञात चोरट्याने फोडले आणि दुकानातील 20 हजारांची रोकड व किराणा असा एकूण 30 हजारांचा लंपास केला आहे.

किराणा दुकान फोडून रोख रकमेसह किराणा लंपास
किराणा दुकान फोडून रोख रकमेसह किराणा लंपास

By

Published : Apr 1, 2020, 3:14 PM IST

अमरावती - येथे लॉकडाऊनचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने किराणा दुकान फोडून रोख रकमेसह किराणा लंपास केल्याची घटना वलगाव गावात उघडकीस आली आहे.

किराणा दुकान फोडून रोख रकमेसह किराणा लंपास

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या सर्वत्र शुकशुकाट आहे. याचाच फायदा घेत अमरावती शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या वलगावातील एक किराणा दुकान अज्ञात चोरट्याने फोडले आणि दुकानातील 20 हजारांची रोकड व किराणा असा एकूण 30 हजारांचा लंपास केला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून वलगाव पोलिसांनी या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

वलगाव येथील लोकमान्य चौकात वामनराव गुल्हाणे यांचे शंकर प्रॉव्हिजन्स या नावाने किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्याने वरच्या माळ्यावरील दरवाजा तोडून खाली प्रवेश केला व काउंटरमधील 20 हजार रोख व 10 हजारांचे किराणा साहित्य चोरून नेले. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details