अमरावती - कोकणात फिरायला गेलेल्या माजी नगरसेवकाचे घर फोडून 1 लाख 36 हजार रोखसह एकूण पावणे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शंकरनगर परिसरात ही घटना घटली.
काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड हे पत्नी आणि मुलासह कोकणात फिरायला गेले होते. मंगळवारी सकाळी ते अमरावतीला परत येत असताना शेजारी राहणाऱ्या भुसारी यांचा तुमच्या घराचे दार उघडे आहे, असा फोन आला. यानंतर मुन्ना राठोड यांनी लगेच त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्याला घरी पाठवले तसेच राजपेठ पोलीस ठाण्यालाही माहिती दिली.