अमरावती :अंजनगाव -अकोट मार्गावरील खाऱ्या नाल्या जवळील एका व्यवसायिकाच्या गोडाऊनवर रविवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान दरोडा (Robbery at businessman godown) टाकण्यात आला. दरोडेखोर असलेल्या पाच ते सहा अज्ञात लोकांनी व्यापारी व रखवाल्याला मारहाण (beating up servant along with businessman) करून अलमारीमधील (latest news from Amravati) जवळपास चार लाख रुपये लुटून नेल्याची (robbers stole the money) घटना घडल्याने (robbers looted four lakh rupees) अंजनगाव तालुक्यात एकच खळबळ (Amravati Crime) उडाली आहे. (Robbery at Godown)
असे आहे संपूर्ण प्रकरण :अंजनगाव-आकोट रोड वरील स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाऱ्या नाल्याजवळ अब्दुल फारूक अब्दुल रहमान वय ५५ रा. बुधवार सुर्जी अंजनगाव यांचे बिल्डिंग मटेरियल आणि जुन्या चार चाकी वाहन विक्रीचे गोडाऊन आहे. गोडाऊन मध्येच मालक एका रूममध्ये मुक्कामी राहत असतो. काल रात्री च्या दरम्यान रखवाली व मालक गोडाऊन च्या आत मध्ये असताना दिनांक रविवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान जवळपास पाच ते सहा अज्ञात व्यक्ती सदर गोडाऊनचे शटर उघडून तेथील रखवालीचे हात पाय बांधून ठेवून रखवालदाराला एका लोखंडी टामीने मारहाण केली करून बाजूच्या खोलीत आराम करीत असलेले व्यवसायिक अब्दुल फारूक अब्दुल रहमान वय ५५. यांना पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी गंभीर मारहाण करून आलमारीतील चार लाख रुपये लुटून नेले. तसेच सदर व्यवसायाचे दोन तर एक रखवालदाराचा मोबाईल, गोडाऊन मधील सीसीटीव्हीचे मेमरी बॉक्स फोडून सीसीटीव्हीचे सामान सुद्धा अज्ञान आरोपींनी सोबत नेले.