अमरावती - विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही अमरावती शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवांसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आलेल्या परवानगीचा गैरफायदा नागरिक घेताना दिसत आहेत.
अमरावती शहरात रस्त्यावर गर्दी कायम; सवलतीचा नागरिक घेत आहेत गैरफायदा - Corona Lockdown
घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही अमरावती शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवांसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आलेल्या परवानगीचा गैरफायदा नागरिक घेताना दिसत आहेत.
अमरावती
राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असताना अमरावती जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमूळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही सहा वरच स्थिरावली आहे. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून उरलेल्या पाच रुग्णांपैकी तीन रुग्णाची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.