महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आश्वासनांचा विसर पडलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मनसेचा रास्ता रोको - संत्रा उत्पादक शेतकरी

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तरतूद, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, शहरासह ग्रामिण भागाचा विकास, शहराबाहेरून बायपास रोड, अचलपूरला जिल्हा घोषीत करा इत्यादी मागण्यांकरिता, मंगळवारी मनसेच्या वतीने अमरावतीच्या परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन

By

Published : Jul 17, 2019, 9:37 AM IST

अमरावती - स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तरतूद करण्यासह शेतकरी आणि नागरिकांशी संबंधीत विविध मागण्यांसाठी मंगळवारी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरातील परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यंना ताब्यात घेऊन परीस्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांना सोडून दिले.

चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन
सत्तेत येण्यापूर्वी सरकारकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, शहरासह ग्रामीण भागाचा विकास, शहराबाहेरून बायपास रोड याबाबत विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे. सध्या युवकांना कोणत्याही क्षेत्रात नोकऱ्या अथवा काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे, तसेच, शेतकऱ्यांकरीता महत्त्वाचा असलेला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बाबतही प्रशासन बोलायला तयार नाही, असा आरोप मनसेने केला आहे.
याचबरोबर अचलपूरसह आजूबाजूच्या तालुक्याचा विकास होऊन मेळघाटातील आदीवासीयांसाठी सोई-सुविधा पुरवायच्या असतील, तर अचलपूर जिल्हा होणे गरजेचे आहे. मात्र यावरही शासनाकडून कारवाई होताना दिसत नाही. शहरासह ग्रामीण भागातही विकास व्हायला पाहीजे तो देखील होताना दिसत नाही. त्या दिशेने सरकारने कामे केली पाहिजेत, या मागण्यांकरीता मंगळवारी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात चांदुर नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details