महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या कामासाठी जाताना नायब तहसीलदाराच्या गाडीचा अपघात; अमरावतीतील घटना - nayab tahasildar

निवडणूक कामाकरिता जात असताना नायब तहसीलदारांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातात नायब तहसीलदार गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

गाडीचा अपघात

By

Published : Oct 20, 2019, 7:55 PM IST

Updated : Oct 20, 2019, 8:17 PM IST

अमरावती - चांदुर बाजार येथून अचलपूरला निवडणूक कामाकरिता जात असताना नायब तहसीलदारांच्या गाडीचा तोंडगाव नजीक अपघात झाला. अपघातात नायब तहसीलदार गंभीर जखमी झाले असून चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

अचलपूर मतदारसंघातील निवडणुक कामाकरिता नायब तहसीलदार गजानन पाथरे हे कर्मचाऱ्यांसह अचलपूरला जात होते. दरम्यान तोंडगाव नजीक त्यांच्या खासगी वाहनासमोर कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात नायब तहसीलदार गजानन पाथरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Last Updated : Oct 20, 2019, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details