महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Rain: अमरावती जिल्ह्यात सलग तीस तासांपासून पाऊस सुरू; नदी नाल्यांना आला पूर - Rivers flooded in Amravati district

अमरावती जिल्ह्यात सलग तीस तासांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

Amravati Rain
अमरावती जिल्ह्यात पाऊस

By

Published : Jul 12, 2023, 2:23 PM IST

अमरावती जिल्ह्यात पाऊस

अमरावती :सलग तीस तासांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात पाऊस कोसळतो आहे. अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे वरुड, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या तालुक्यांमध्ये अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक खोळंबली आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

पूर्णा प्रकल्प तुडुंब, सतर्कतेचा इशारा : सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे पूर्णा प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग आज केला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी तैनात असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर हे तीन तालुके वगळता अमरावती, तिवसा, दर्यापूर, वरुड, मोर्शी, चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे.


अनेक भागात नदी, नाल्यांना पूर :वरुड तालुक्यात शेंदुरजना घाट येथील नाल्याला पूर आला आहे. तिवसा घाट शेंदुर्जना घाट या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. वरुड तालुक्यातील जीवना आणि चुडामन या दोन्ही नदी पातळी भरून वाहत आहेत. या नद्यांना पूर आल्याने लगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. अंजनगाव सुर्जी करजगाव शिरजगाव कुऱ्हा या भागात असणाऱ्या मोठ्या नाल्यांना पावसामुळे पूर आला आहे. या नाल्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक प्रभावित झाली. पुरामुळे वाहत आलेला कचरा हा पुलाजवळ अडकल्यामुळे पाणी पुलावरून वाहत आहे.

आजही पावसाची झड :मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मध्यरात्री देखील रिमझिम पाऊस बरसला. आज पहाटे पावसाने काहीशी उघड दिली असताना सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आज दिवसभर पावसाची झड राहणार, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आता पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Nashik News : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही; शेतकर्‍यांनी पेरण्यांची घाई करू नये - कृषी विभागाचे आवाहन
  2. Heavy Rain In Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये एका दिवसात 153 मिलिमीटर पाऊस, वेण्णा तलाव ओव्हर फ्लो- पाहा व्हिडिओ
  3. Delhi Flood Alert : यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पाणी पातळी रेकॉर्ड ब्रेक करणार, नागरिकांच्या जीवाचे मात्र हाल

ABOUT THE AUTHOR

...view details