महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Revival Of Rivers In Amravati : अमरावती जिल्ह्यातील 'या' तीन नद्यांचे होणार पुनरुज्जीवन, अनेक गावे होणार पाण्याने समृद्ध - अरविंद नळकांडे समन्वयक नदी जोडो अभियान

अमरावती जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत तीन नद्यांचे (rivers Kholad Pingalai and Chandrabhaga) पुनरूज्जीवन होणार आहे. गाळामुळे नद्यांची वहन साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत (Revival Of Rivers In Amravati) आहे.

river Jodo campaign
नदी जोडो अभियान

By

Published : Jan 9, 2023, 9:29 AM IST

प्रतिक्रिया देताना अरविंद नळकांडे, समन्वयक नदी जोडो अभियान

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील खोलाड, पिंगळाई आणि चंद्रभागा या तीन (rivers Kholad Pingalai and Chandrabhaga) नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 'चला जाणूया नदीला' या अभियानाला जिल्हाधिकारी पावनीत कौर यांच्या हस्ते वरखेड येथे पिंगळी नदीचे जलपूजन करून नुकताच प्रारंभ झाला. हा उपक्रम हमखास यशस्वी होणार असून, या उपक्रमाद्वारे या नद्यांच्या काठी वसलेले प्रत्येक गाव हे पाण्याने समृद्ध होणार, अशी आशा व्यक्त केली जात (Revival Of Rivers In Amravati) आहे.

असे आहे अभियान :नद्यांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी चला जाळू या नदीला या अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा, नदी साक्षरतेबाबत जनजागृती करणे. नदीचा तट प्रवाह जैवविविधतेबाबत जनजागृती नदी खोऱ्यांचे नकाशे, पूररेषा, पाणलोट क्षेत्रांचे नकाशे, मातीचे रक्षण पूर आणि दुष्काळ, अतिक्रमण, शोषण, प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम याबाबत सखोल अभ्यास करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती या अभियानाचे समन्वयक रवींद्र नळकांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना (Revival of three rivers in Amravati district) दिली.

'असे' आहे अभियानाचे महत्त्व : काही वर्षात अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते आहे. पूर आणि दुष्काळासारख्या समस्या सर्वत्र उद्भवल्या आहेत. वाढते नागरीकरण व औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला (river Jodo campaign in Amravati) आहे. प्रदूषणामुळे भूजलाची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात घटली आहे. गाळामुळे नद्यांची वहन साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे अभियान अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यात नद्यांचे पुनरुज्जीवन झाल्यावर अनेक भीषण समस्या मार्गी लागू शकतात. असे देखील अरविंद नळकांडे म्हणाले. या अभियानामध्ये सर्वसामान्य नागरिकांना समाविष्ट करून सर्वंकष अभ्यास केला जाईल, नद्यांना अमृतवाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार केला जाणार आहे. नदीचे स्वरूप जाणून घेतले जाईल, तसेच नदीची जैवविविधता तपासली जाणार असल्याचेही अरविंद नळकांडे यांनी (Revival Of Rivers) सांगितले.

गावांचा असावा वॉटर बजेट :काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात एक प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पात एकूण 11 गाव घेण्यात आली होती. त्यावेळी या अकराही गावांचे वॉटर बजेट आम्ही काढले होते. या अकराही गावांमध्ये दरवर्षी 300 कोटी लिटर पाणी हे पावसाद्वारे मिळत होते. या गावातील पिण्याचे पाणी असो किंवा शेती असो तसेच पाण्याची संपूर्ण गरज ही केवळ शंभर कोटी लिटरची असल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ 200 लिटर पाणी हे साठवून ठेवले गेले असते तर त्या गावात भविष्यात पाणीटंचाईची समस्याच निर्माण झाली नसती. असे वॉटर बजेट काढल्याने आमच्या लक्षात आले. आता प्रत्येक गावाचे अशा स्वरूपाचे वॉटर बजेट काढून योग्य नियोजन केले, तर कोणत्याच गावात भविष्यात कधीही पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा देखील अरविंद नळकांडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी संवाद साधताना (river Jodo campaign in Amravati) केला.

ABOUT THE AUTHOR

...view details