महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिखलदऱ्याच्या चिचाटी धबधब्यावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी - जीवाची पर्वा न करता जीवघेणे स्टंट

या धबधब्यावर आंघोळीसाठी येणाऱ्या काही पर्यटकांमध्ये अतिउत्साह पाहायला मिळतो. अनेक पर्यटक जीवाची पर्वा न करता जीवघेणे स्टंट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले पर्यटक कातळाच्या उंचावरील भागाचा चढून धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करतानाचा प्रकार दिसून आला आहे.

चिखलदऱ्याचा चिचाटी धबधबा
चिखलदऱ्याचा चिचाटी धबधबा

By

Published : Aug 11, 2021, 12:43 PM IST

अमरावती - विदर्भाच नंदनवन असलेल्या चिखलदरामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्व धबधबे हे प्रवाहित झाले आहेत. शेकडो फूट हा उंचावरून कोसळणार्‍या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दररोज चिखलदारा मध्ये दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या मोथा गावानजीकचा चिचाटी धबधबा हा सध्या ओसंडून वाहतोय. या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. मात्र काही पर्यटक जीवाला धोका निर्माण होईल असे स्टंट करताना या ठिकाणी दिसून आले आहेत.

चिचाटी धबधब्यावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी

चिखलदरा येथील चिचाटी धबधब्या दरवर्षी पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते, हा धबधबा पर्यटाकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिला आहे. परंतु या धबधब्यावर आंघोळीसाठी येणाऱ्या काही पर्यटकांमध्ये अतिउत्साह पाहायला मिळतो. अनेक पर्यटक जीवाची पर्वा न करता जीवघेणे स्टंट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले पर्यटक कातळाच्या उंचावरील भागाचा चढून धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करतानाचा प्रकार दिसून आला आहे.

पर्यटाकांच्या अशा प्रयत्नात पाय घसरून पाण्यात पडल्याने जीव जाण्याची शक्यता निर्माण होते. यापूर्वीही या धबधब्यावर अकोला जिल्ह्यातील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. एवढे गंभीर बाब समोर आली असताना सुद्धा पर्यटक जीवाची पर्वा न करता जीवघेणी स्टंट करत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस विभाग व वन विभाग दुर्लक्ष करीत आहे.

प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देणं शक्य नाही-

चिखलदरा मध्ये ते अनेक पॉईंट आहे .अनेक धबधबे सुद्धा आहे त्यामुळे पर्यटक येत असतात .त्यात आमच्याकडे सध्या होमगार्ड नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देणे शक्य नाही. तरीही आम्ही वारंवार पेट्रोलिंग करण्यासाठी तेथे जाऊन पर्यटकांना समज देत असतो अशी प्रतिक्रिया चिखलदराचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details