अमरावती :शहरातील फ्रिजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलवडा परिसरात सोमवारी रात्री रोहित उर्फ नादो विजय भोंगळे (25) या युवकावर चौघांनी चाकूने वार (Youth stabbed to death) केले होते. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालावली. आज त्याची अंत्ययात्रा राजापेठ पोलीस ठाण्यासमोरून जात असताना अंत्ययात्रेतील जमावाने अचानक राजापेठ पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालत (Riot In Funeral Procession) ठाण्यात शिरण्याचा प्रयत्न (attempt to enter police station) केला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज (Police attacked with sticks) केला. (Latest news from Amravati) या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Amravati crime)
असा आहे संपूर्ण प्रकार :मंगळवारी रात्री बेनोडा परिसरातील रहिवासी नादो भोंगळे याच्यावर चार तरुणांनी चाकूने वार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रवीण उर्फ पिंटू भीमराव बनसोड ,रुपेश भिमराव बनसोड (दोघेही राहणार बेनोडा) यांच्यासह भीम टेकडी परिसरातील अमोल जोंधळे आणि राहुल नगर येथील रहिवासी सय्यद नाजीम सय्यद सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या चौघांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असताना प्रेजरपुरा पोलीस ठाण्यात लॉकअपची व्यवस्था नसल्याने या चारही आरोपींना राजापेठ येथील ठेवण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मृतक युवकाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री केली होती. काल सकाळी नादोची अंत्ययात्रा करण्यापूर्वी मोठा जमा फ्रिजरपुरा पोलीस ठाण्यासमोर पोहोचला होता. पोलिसांनी या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक होईल असे आश्वासन दिल्यावर सकाळी 11 वाजता बेलवडा परिसरातून नादोची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेदरम्यान बेनोडा परिसरात अमर रहेजा घोषणा देण्यात आल्या.