अमरावती -मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या पातळीत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत धरणाचा जलसाठा तब्बल 94 टक्क्यांपर्यंत पोचला होता. कोणत्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.
अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता - अप्पर वर्धा धरण
आज सकाळी 11 वाजेपर्यंत नळ दमयंती धरणाचा जलसाठा तब्बल 94 टक्क्यांपर्यंत पोचला होता. प्रशासनाकडून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर
प्रशासनाकडून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून या धरणात केवळ 50 टक्के जलसाठा होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, यावर्षी पुरेसा साठा असल्याने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.