अमरावती:Research On Sun Layers भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता लवकरच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य L1' हे यान लवकरच झेपावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सूर्याभोवती असणाऱ्या एकूण चार लेअर्सचा अमरावतीचे शास्त्रज्ञ डॉ व्ही टी इंगोले यांनी सूक्ष्म अभ्यास केला. यामाध्यामातून त्यांनी मुख्य चार लेयर्स व आणखी 11 सबलेयर्स शोधल्या असल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील माहिती 'आदित्य L1' मोहिमेत ही माहिती उपयुक्त ठरेल असा विश्वासदेखील डॉ. इंगोले यांनी 'ई टिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे. (Dr V T Ingole) (Four main layers of sun) (11 Sublayers around sun) (Aditya L1) (ISRO) (Research On Sun Layers) (Amravati Scientist Claims)
अशी आहे लेअर्सची रचना:सूर्य हा एक तप्त गोळा असून त्यातून प्रकाश आणि उष्णता बाहेर पडतो. त्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला ऊर्जा मिळते, अशी साधी माहिती सर्वांनाच आहे. आतापर्यंत सूर्या संदर्भात झालेल्या संशोधनामध्ये सूर्य हा तप्त वितळलेल्या रसाने बनलेला असून त्यावर एक प्रकाशमानाची लेयर आहे. त्या लेयरला फोटोसपियर म्हणतात. या लेअर मधूनच आपल्याला दिसणारे सप्तरंगी प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. यानंतर प्रोमोस्पियर ही दुसरी लेयर असून त्यामधून अल्ट्राव्हायोलेट किरण निघतात. त्यानंतर ट्रान्झिशन रिजन नावाची तिसरी लेयर असून त्यामधून अतिनिल किरण म्हणजेच हाय अल्ट्रा वायोलेशन बाहेर पडतात. शेवटी कोरोना नावाची सर्वांत जड लेअर आहे. या कोरोना लेयर संदर्भात ढोबळमानाने माहिती उपलब्ध नाही. मात्र या कोरोना लेयर्सच्या तीन सब लेयर्सची माहिती यापूर्वीच जगाला कळली होती. आता आमच्या अभ्यासात नव्याने 11 सब लेयर्स आढळले असल्याचे डॉ व्ही. टी. इंगोले म्हणाले.
'या' सबलेयर्सचा अभ्यास:सूर्यासंदर्भात आजवर झालेल्या अभ्यासात फोटोसपियर, प्रोमोस्पियर, ट्रान्झिशन रिजन आणि कोरोना या सूर्याभोवती असणाऱ्या चार लेअर्स सर्वांना माहिती होत्या. मात्र गेल्या वेळी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी आमच्याकडे उपलबध सर्व उपकरणांच्या सहाय्याने सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले. सुर्यग्रहण लागण्यापूर्वी तसेच सूर्यग्रहण लागल्यावर आणि ते सुटल्यानंतर सूर्यप्रकाशातील अति सूक्ष्म बदल आम्ही आमच्या उपकरणात संचित (स्टोअर) केलेत. त्यानंतर त्याचा अभ्यास करून विश्लेषण केले. सूर्याच्या सर्व लेअरच्या जाडीची गणित आणि उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळवून पाहिली असता आम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेत. क्रोमोस्फियर लेअरच्या आत तीन सबलेयर्स आम्हाला आढळून आल्या. तसेच ट्रान्झिशन रीजन या लेयरमध्ये एकूण आठ सबलेयर्स देखील आढळून आलेत. सूर्या संदर्भात ही माहिती अतिशय नवीन आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीची दखल इस्त्रो नक्कीच घेईल, अशी आशा डॉ व्ही टी इंगोले यांनी व्यक्त केली.