अमरावती - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि. 23 जुलै)रोजी पहाटेपासूनच जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 55.5 मीमी इतका पाऊस झाला आहे. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासह जिल्ह्यातील सहा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग होत असून अपर्वता धरणाची सर्व दारे 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत.
अप्पर वर्धा धरणापासून पाण्याचा विसर्ग - अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा 85.31% पर्यंत पोहोचला आहे . शहानूर मध्यम प्रकल्पाच्या चार दरवाजांमधून 14.20 घनमीटर प्रतिसेकंद चंद्रभागा प्रकल्पाच्या तीन दरवाजांमधून 11.87 पूर्णा प्रकल्पाच्या दोन दरवाज्यांमधून 12.34 सपन प्रकल्पाच्या चार दरवाजांमधून 16.64 घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.