अमरावती -अमरावतीमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी (Curfew in Amravati) लावण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चार दिवसांची संचारबंदी पोलीस प्रशासनाने लावली होती. त्यानंतर संचारबंदी आणखी वाढवण्यात आली आहे. परंतु या संचारबंदीत आता काही प्रमाणात शिथिलता देण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. आजपासून अमरावतीमध्ये सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यत जीवनावश्यक वस्तूचे दुकाने आणि कृषी केंद्रे उघडण्यास करण्यास पोलीस विभागाने मुभा दिली आहे. तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालय व बँका या पूर्ण वेळात सुरू राहणार असून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही आता संचारबंदीत सूट देण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग (Commissioner of Police Dr. Aarti Singh) यांनी दिली आहे. दरम्यान शहरातील इंटरनेट सेवा मात्र बंदच राहणार असून शासकीय कार्यालयातील व बँकेतील इंटरनेट हे सुरू होणार आहे. दरम्यान पुढील परिस्थिती पाहून संचारबंदीत आणखी शिथीलता देण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाचे म्हणने आहे.
अमरावतीत संचारबंदीत आणखी शिथिलता; जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने व कृषी सेवा केंद्र होणार खुले - अमरावती संचारबंदी न्यूज
आजपासून अमरावतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यत जीवनावश्यक वस्तूचे दुकाने आणि कृषी केंद्रे उघडण्यास करण्यास पोलीस विभागाने मुभा दिली आहे. तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालय व बँका या पूर्ण वेळात सुरू राहणार असून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही आता संचारबंदीत सूट देण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांनी दिली आहे
त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी एका समूहाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान पाच ते सात दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी शनिवारी अमरावती शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे शनिवारी अनेक संघटना या रस्त्यावर उतरल्या होत्या. याच दरम्यान अमरावतीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी जाळपोळ, दगडफेक देखील झाली होती. तर शहराच्या एका भागामध्ये दोन समूहाचे लोक आमने-सामने आल्याने मोठा हिंसाचार झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे.
अमरावतीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट -
शहरातील हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आले आहे. मात्र, हे अहवाल अतिशय धक्कादायक आहे. तर अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशी खळबळजनक माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. तर काही वेळ इंटरनेट सुरु झाल्यानंतर 4 हजार ट्विट झाले हे आक्षेपार्ह असल्याचेही या अहवालात दिसून येत आहे, असेही मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.