महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कोविड रुग्णालयात नातेवाइकांचा गोंधळ - अमरावती कोरोनाबाधित रुग्णसंख्या न्यूज

नागपूरातील थडी पवनी गावातील ८० वर्षीय वृद्धाची प्रकृती अचानक ढासळली होती. या वृद्धाला शासकीय सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात १८ तारखेला दाखल केले होते. त्याच रात्री काही कालावधीनंतर या वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमरावती कोरोनाबाधित मृत्यू लेटेस्ट न्यूज
अमरावती कोरोनाबाधित मृत्यू लेटेस्ट न्यूज

By

Published : Sep 20, 2020, 1:30 PM IST

Updated : Sep 20, 2020, 1:37 PM IST

अमरावती -कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीतील शासकीय सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात ही घटना घडली. या सर्व प्रकारावर गाडगे नगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संतप्त नातेवाइकांना शांत केले आहे.

कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कोविड रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
नागपूर जिल्ह्यातील थडी पवनी गावातील एका ८० वर्षीय वृद्धाची प्रकृती अचानक ढासळली होती. त्यानंतर या वृद्धाला अमरावतीतील शासकीय सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात १८ तारखेला उपचारासाठी दाखल केले होते. त्याच रात्री या रुग्णाचे नातेवाईक डबा घेऊन गेले असता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. काही कालावधीनंतर या वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते. डॉक्टर व नातेवाईक यांच्यात होणार वाद लक्षात घेता, तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला गेला. या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.
Last Updated : Sep 20, 2020, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details