अमरावती - मोदी लाटेतही मोठ्या फरकाने विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोझरी ते तिवसा भव्य दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी आला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी फुलझेले यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शनही घेतले.
काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल - काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह मोझरी ते तिवसा भव्य दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.
हेही वाचा -कृषि मंत्री अनिल बोंडेंनी बैलगाडीत मिरवणूक काढून केला उमेदवारी अर्ज
गेल्या दोन टर्म यशोमती ठाकूर काँग्रेस पक्षाकडून तिवसा मतदार संघाच्या आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी भाजपाच्या उमेदवार निवेदिता चौधरी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मोदी लाटेतही गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवला होता. यंदा यशोमती ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेश वानखडे उमेदवार आहेत. याच मतदारसंघातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील मोझरी येथे भाजपने महाजनादेश यात्रेचा शुभारंभ केला होता.
TAGGED:
tiwasa assembly constituency