अमरावती- कोरोनाच्या धास्तीमुळे अमरावतीची कुलदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिरातील भाविकांची गर्दी ओसरली आहे. दर मंगळवारी प्रचंड गर्दी असणाऱ्या दोन्ही मंदिरात आज शुकशुकाट पाहायला मिळात आहे.
अंबादेवी, एकवीरा देवींच्या भक्तांची गर्दी ओरसली कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले असता श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिरात भाविकांची नेहमीच असणारी गर्दी बरीचशी कमी झाली आहे. रविवारपासूनच अंबादेवी मंदिरात भाविकांच्या गर्दीला आळा बसला आहे. आज मंगळवार असतानाही दोन्ही मंदिरात मोजकेच भाविक दर्शनासाठी आले होते.
पुजाऱ्यांनी लावले मास्क, मंदिरात स्वच्छतेला प्राधान्य
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दोन्ही मंदिर संस्थानच्या वतीने मंदिरातील पुजाऱ्यांना मास्क लावण्याची सक्ती केली आहे. देवीच्या गाभाऱ्यात बसलेले पुजारी तसेच मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसेच सुरक्षारक्षकांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक भाविकही तोंडाला मास्क लावून देवीचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळते आहे.
स्वच्छतेला प्राधान्य
दोन्ही मंदिरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून श्री अंबादेवी मंदिरात वेळोवेळी फरश्या पुसण्यात येत आहे. तसेच मंदिरातील खांबही पुसले जात आहेत. देवीचे दर्शन घेतल्यावर भाविकांना लगेच मंदिराबाहेर पडण्याच्या सूचना दोन्ही मंदिरामध्ये देण्यात येत आहे.
हेही वाचा -अमरावती : कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी चक्क फुकट वाटल्या कोंबड्या