अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यापैकीच गर्दीवर नियंत्रण हा महत्त्वाचा उपाय असून कोरोना किती घातक आहे, हे अमरावतीकारांच्या लक्षात आणून देण्याकरिता पोलिसांनी 'रेड कोरोना'ची मदत घेतली. पोलिसांचा हा 'रेड कोरोना' पाहून 'भागो कोरोना आया', अशी प्रतिक्रिया शहरात उमटली. विषेध म्हणजे पोलिसांच्या या उपक्रमाचा परिणाम म्हणजे शहरातील गर्दी नेहेमीपेक्षा कमी झाली.
विनाकारण फिरू नका -
शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. रविवारी जिल्ह्यात 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर असताना अनेकांचे प्राण वाचावे, यासाठी शहरात गर्दी करू नका, विनाकारण घराबाहेर फिरू नका, असा संदेश रेड कोरोनाद्वारे देण्यात आला.