अमरावती- जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सबके लिये खुला है मंदिर यह हमारा। मतभेद को भुला है, मंदिर यह हमारा। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी। असा संदेश या प्रार्थना मंदिरातून दिला जातो. मात्र, आता जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात महाराष्ट्रात ४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर बंद ठेवण्यात येत आहे.