अमरावती Rapper Saurabh Abhyankar : आधी आमच्या फॅशन शोची तिकीटं विकून दे, त्यानंतरच तुला पाच मिनिटांसाठी परफॉर्म करू देतो, अशी रॅपर सौरभ अभ्यंकरला अट घातली जायची. त्यानंतर केवळ मिळणाऱ्या पाच मिनिटात रॅप सादर करत होतो, असं सांगणाऱ्या अमरावतीच्या रॅपर सौरभ अभ्यंकरचं जीवन एमटीव्ही हसल 3.0 च्या पुरस्कारानंतर पार बदललंय.
तीस हजार जणांच्या यादीतून सिलेक्शन : मुळचा अमरावतीचा असलेल्या सौरभ अभ्यंकरनं 12 वी नंतर पॉलिटेक्निक केलं. परंतु, अभ्यासापेक्षा सौरभला रॅप आणि संगीतामध्ये अधिक आवड असल्यानं त्यानं 2016 मध्येच मुंबईची वाट धरली. तेथील रॅपरला भेटून चर्चा करणं, त्यांचं राहणीमान पाहणं आणि व्हिडिओ काढणं याची प्रचंड आवड होती. त्यातूनच बऱ्याच ठिकाणी ऑडिशन देत होतो, परंतु काहीच हाती लागत नसल्याचं सौरभ सांगतो. परंतु, अशातच मला एक दिवस एमटीव्हीमधून फोन कॉल आला. तीस हजार जणांच्या यादीतून माझं 'हसल 3.0' साठी सेलेक्शन झालं होतं. सीझन 3 चा प्रीमियर 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. विक्ड सनी आणि सुपर माणिक यांनी सूत्रसंचालन केलेल्या या शोला दुसऱ्यांदा बादशाह आणि चार स्क्वॉड बॉस ईपीआर, डिनो जेम्स, डी एमसी आणि इक्का यांनी परीक्षक म्हणून काम केल्याचं सौरभनं सांगितलं. दिल्लीतील उदय पांधी 'एमटीव्ही हसल 3.0' रॅप रिअॅलिटी टेलिव्हिजन शोचा विजेता आहे. या शोमध्ये सौरभनं '100RBH ओजी हसलर ट्रॉफी' जिंकली होती.