अमरावती -एका अल्पवयीन युवतीला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. तसेच तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका व्यक्तीला अटक केली आहे. सुरज रामटेक (40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वारंवार लैगिंक शोषण -
आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीच्या आईला कॉल करून मुलीला अमरावतीच्या रामकृष्ण कॉलनीत घरी स्वच्छता करण्यासाठी बोलवले होते. मुलगी या ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीने तिला कोल्ड्रींक देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर पीडित अल्पवयीन युवतीला नग्न करत तिचे छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना जून 2020 मध्ये घडली होती. मात्र, अखेर या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.