महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Graduate Constituency Election : पदवीधर मतदार संघ निवडणूक, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रणजीत पाटील भरणार उमेदवारी अर्ज - भाजपचे विदर्भ संघटन मंत्री चैनसुख संचेती

पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत ( Graduate Constituency Election 2023 ) आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून रणजित पाटील ( Ranjeet Patil Will File Application ) यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. रणजित पाटील हे 11 जानेवारीला आपला उमेदवारी अर्ज देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत.

Graduate Constituency Election
भाजपचे विदर्भ संघटन मंत्री चैनसुख संचेती

By

Published : Jan 7, 2023, 6:53 PM IST

भाजपचे विदर्भ संघटन मंत्री चैनसुख संचेती

अमरावती -पदवीधर मतदार संघाची निवडणूक ( Graduate Constituency Election 2023 ) 30 जानेवारीला होणार असून या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा भाजपच्या वतीने डॉ रणजीत पाटील ( Ranjeet Patil Will File Application ) भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत 11 जानेवारीला डॉक्टर रणजीत पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे भाजपचे विदर्भ संघटन मंत्री चैनसुख संचेती यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

11 जानेवारीला पदवीधर मेळावा11 जानेवारीला पोटे महाविद्यालय संकुलाच्या भव्य सभागृहात सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Presence ) आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp State President Chandrashekhar Bawankule ) यांच्या उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रमुख नेते पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यानंतर डॉक्टर रणजीत पाटील ( Ranjeet Patil Will File Application For Graduate Constituency ) हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दोन लाखांहून अधिक मतदारअमरावती पदवीधर मतदार संघात अमरावती अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील 56 तालुके आणि तीन विधानसभा मतदार संघ मिळून एकूण दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. यापैकी दीड लाख मतदारांची नोंदणी ही भाजपने केली असल्याचा दावा चैनसुख संचेती ( Chainsukh Madanlal Sancheti ) यांनी केला.

निवडणूक जिंकण्याचा विश्वासअमरावती पदवीधर मतदार संघाची ( Amravati Graduate Constituency Election ) निवडणूक भाजपचे उमेदवार डॉक्टर पाटील हे निश्चितपणे जिंकणार असा विश्वास चैनसुख संचेती यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी देखील पदवीधरांसाठी गत बारा वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे आपण विजयी होऊ असा विश्वास आहे. तरी ही एक लढाई असून ही निवडणूक गांभीर्याने लढली जाईल, असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details